चीन मनुष्यबळाच्या जोरावर वेगाने विकसित होऊ शकला, तसा विकास भारताचा होऊ शकला नाही. चीन आर्थिक महासत्ता बनला, पण भारतात केवळ आर्थिक विकासाचे काही फुगवटे निर्माण झाले
अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा खूप मोठा वाटा चीन आणि भारताच्या आर्थिक समृद्धीमध्ये आहे. पण चीनची यशस्वी ठरलेली विकासाची योजना ही मनुष्यबळ आणि स्त्री-पुरुष समानता, या दोन महत्त्वाच्या बाबींवर आधारित आहे, ज्यामध्ये भारत खूप पिछाडीवर आहे. चीनने विकासाचा एक प्रशंसनीय मार्ग निर्माण केला आहे, तर भारत डोळे बंद करून एका आभासी मार्गावर उडी मारण्याचा धोका पत्करत आहे.......